लवकरच, मी नवीन काहीतरी घेऊन आपल्या भेटीला येईल
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवे गाणे भाऊबीजेच्या मुहूर्ताला रिलीज झाले. हे गाणे शेअर करताना त्यांनी स्वत:चा आणि मुलीचा फोटो वापरला आहे. अमृतांच्या या गाण्याला दोनच दिवसांत 10 लाखांपेक्षा अधिक व्यूव्हज मिळाले आहेत. त्यामुळे, अमृता यांनी ट्विट करुन चाहत्यांचे आणि टीकाकारांचेही आभार मानले.
इंटरनेटवर हे गाणं चागलंच व्हायरल झाला. तर, काहींनी टीकाही केली, त्याबद्दल अमृता फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. ''तिला जगू द्या... या गाण्याचं आपण कौतुक केलंत, त्यामुळेच गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 लाख व्ह्यूवज तिला मिळाले असून आपण गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे आभार, असे अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. तसेच, माझं कौतुक करणाऱ्या आणि माझ्यावर टीका करणाऱ्या सर्वांचं मी आभार मानते. लवकरच, मी नवीन काहीतरी घेऊन आपल्या भेटीला येईल,'' असेही अमृता यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय.
अमृता फडणवीस यांच्या गाण्याला 1 मिलियन्स पेक्षा अधिक व्यूव्हज मिळाले आहेत. अनेकांनी या गाण्यावरुन अमृता फडणवीस यांना ट्रोलही केले. तसेच, भाजपाविरोधी पक्षातील समर्थकांनीही या गाण्यावरुन टीका केली.