रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कसे कराल
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 18 नोव्हेंबर 2020 (15:06 IST)

सरकारने आधार कार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी आता ‘हा’ कोड जोडला आहे

आधारकार्ड हे आता प्रत्येक व्यक्तीसाठी सर्वात महत्वाचे आणि आवश्यक कागदपत्र बनले आहे. ब-याच शासकीय आणि खासगी कामासाठी आधारकार्ड आवश्यक आहे. या माध्यमातून बर्याच सरकारी योजनांचा लाभ घेता येतो. त्यामुळे आधार कार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी सरकारने आता क्यूआर कोड जोडला आहे. ज्याच्या मदतीने त्याचा वापर करणे सुलभ झाले आहे.
 
कोडमुळे ऑफलाइनही वापर होणार
सरकारने आधार कार्डला अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यात क्यूआर कोड जोडला आहे. मोबाइलवरून हा कोड स्कॅन करताच तुमची सर्व माहिती आपल्यासमोर येईल. विशेष म्हणजे यासाठी इंटरनेटची गरज भासणार नाही. अशा परिस्थितीत आपल्याला आता सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज मिळू शकेल. यासाठी 50 रुपये फी भरावी लागते. पीव्हीसी कार्ड एक प्रकारचे प्लास्टिक कार्ड आहे, जे एटीएम कार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सारखेच आहे.