शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 एप्रिल 2017 (10:55 IST)

एसटीच्या १ लाख १० हजार कर्मचाऱ्यांना वेतन वाढ

राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एसटी महामंडळाच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात आली आहे. तर कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षांहून एक वर्ष करण्यात आला आहे.

विधान परिषदेत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली. 1 एप्रिल 2017 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कनिष्ठ वेतनश्रेणीत सहा महिने पूर्ण झाल्यानंतर वेतनात 500 रुपयांनी वाढ करण्यात येईल. एक वर्ष कनिष्ठ वेतनश्रेणीत काम केल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यात येईल. कनिष्ठ वेतनश्रेणी 2000 साली लागू करण्यात आली. सेवेत रुजू झाल्यानंतर 5 वर्षे कनिष्ठ वेतनश्रेणीत काम करण्याची त्यावेळी तरतूद करण्यात आली होती. तब्बल पाच वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ होतो. मात्र 2012 पासून कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी 3 वर्षे एवढा करण्यात आला. या वेतनश्रेणीत सध्या एकूण 25 सेवाअंतर्गत 12 हजार 514 कर्मचारी कार्यरत आहेत.