शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (07:51 IST)

राज्य सहकारी बँक घोटाळा, अजित पवारांसह ६५ संचालकांना दिलासा

राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीअजित पवारांसह ६५ संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालात अजित पवार, हसन मुश्रीफ आणि ६५ संचलकांना क्लीनचिट देण्यात आली आहे. यापूर्वी SIT नेही अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेवरील ७५ जणांना क्लीन चीट दिली होती. आता सहकार विभागाच्या अहवालातही अजित पवारांना क्लीन चीट मिळाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. हा चौकशी अहवाल सहकार आयुक्तांना सादर करण्यात आला असून  देण्यात आली आहे.
 
राज्याच्या सहकार विभागाने राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीने अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला. या अहवालात अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, आनंदराव आडसूळ आदी ६५ जणांना क्लीनचिट देण्यात आली आहे.