शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 25 जुलै 2018 (09:12 IST)

विद्यार्थी पालकाचा शाळेवर बहिष्कार, गांधी पद्धतीने आंदोलन

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील पैनगंगानगर येथील जिल्हा परिषद शाळेत योग्य प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याने गावातील पालक आणि शव्यवस्थापन समितीने मागील 7 दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंद करून शाळेवर बहिष्कार टाकला आहे.
 
जिल्हा परिषद च्या शाळेत वर्ग 5 ते 10 मध्ये 320 विद्यार्थी शिक्षण घेत आहे येथिल माध्यमिक विद्यालय मध्ये 11 शिक्षकांची पदे मंजूर असतांना केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे या संदर्भात पालकांनी शिक्षण विभाग कडे वारंवार लेखी निवेदन दिले मात्र शाळेला शिक्षक मिळाले नाही.
 
शाळेत केवळ दोन शिक्षक कार्यरत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक नुकसान होत आहे असे पालकांनी म्हटले मात्र शिक्षण विभागाने कुठलीच दखल घेतली म्हणून पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही असा पवित्रा घेतला त्यामुळे पालकांनी आणि गावकऱ्यांनी 7 दिवसापासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणे बंद केले आहे.