1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पश्चातापातून तरुणाची आत्महत्या

sucide in jalgaon
जळगावमध्ये चोरीच्या घटनेत अटक होऊन दोन दिवसांपूर्वीच जामीन झाल्यानंतर  घडलेल्या घटनेच्या नैराश्यातून एका तरुणाने रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी असोदा रेल्वेगेटनजीक डाऊन मार्गावर घडली. दुपारी ४ वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. संघर्ष उर्फ राजेश संजय ठाकरे (२२) असे या तरुणाचे नाव आहे. 
 
दुपारी १२ वाजेच्या दरम्यान रेल्वे डाऊन लाईनवर असोदा रेल्वे गेटजवळ एका युवकाने आत्महत्या केली असल्याची माहिती तालुका पोलिसांना रेल्वेचे उप स्टेशन प्रबंधक आर. के. पलरेजा यांनी तालुका पोलिसांना दिली. यावेळी काही युवकांनी संघर्षला ओळखले.