शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 एप्रिल 2019 (09:26 IST)

प्रवाशाकडून अचानकच गोळीबार

iring from the passenger
लातूर मध्यवर्ती बसस्थानकात एका प्रवाशाने अचानकच गोळीबार केला. या अज्ञात व्यक्तीकडून इतरांना मारण्याच्या हेतूने गोळीबार करण्यात आला. मात्र या गोळीबारात तोच जखमी झाला झाला. गुरुवारी  मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी फरार झाला आहे. मध्यवर्ती बसस्थानकात पंढरपूर हदगाव ही बस थांबली होती. त्यात खिडकी जवळ बसलेल्या एका प्रवाशाने स्वतःजवळील बंदूक काढून त्यातून गोळी झाडली. गोळी खिडकीच्या गजावर आदळल्याने तोच किरकोळ जखमी झाला. गोळीबाराच्या आवाजाने बसस्थानकात एकच खळबळ उडाली. याचा फायदा घेत आरोपीने तेथून पळ काढला.