1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (16:24 IST)

जवानाच्या पत्नीने दोन लहान मुलांसह केली आत्महत्या

suicide in kolhapur
कोल्हापूर येथे जवानाच्या पत्नीने दोन चिमुकल्यांसह पेटवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात घडली असून, स्वाती महेश पाटील असे आत्महत्या केलेल्या जवानाच्या पत्नीचे नाव आहे. स्वाती यांनी आत्महत्या का केली याचे नेमक कारण अद्याप समजू शकलेले आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. 
 
स्वाती या शाहूवाडी तालुक्यातील नेर्ले गावात दोन मुलांसोबत राहत होत्या. गुरुवारी दिवसभर स्वाती आजूबाजूच्या परिसरात न दिसल्याने शेजारील लोकांनी त्यांच्या घराचे दार ठोठावले. त्यावेळी दरवाजा उघडताच शेजाऱ्यांना विभावरी (4) आणि शिवांश(1) या दोन चिमुरड्यांचे मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळून आले. तर त्यांच्या बाजूलाच स्वाती यांचाही मृतदेह जळालेल्या स्थितीत आढळला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. स्वाती यांचे पती सध्या राजस्थान येथे भारतीय सैन्याच्या  सेवेत असून,  पाटील कुटुंबीय  वर्षभरापूर्वी नेर्ले गावात राहायला आले होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी छोटा मुलगा शिवांशचा वाढदिवसही साजरा केला होता. मात्र त्यांनी अचानक आत्महत्या का केली याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. याबाबत सध्या पोलिस तपास करीत आहे.