बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (08:13 IST)

लग्नानंतर तिसऱ्या दिवशी विवाहितेची आत्महत्या

भुसावळ तालुक्यातील शिंदी येथील नवविवाहितेने लग्नानंतर तिस-याच दिवशी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. पुजा रविंद्र चौधरी (22) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. तिचे बोदवड तालुक्यातील विचवा येथील तरुणासोबत नुकतेच लग्न झाले होते. 

माहेरी आल्यानंतर विषारी द्रव प्राशन करत तिने आत्महत्या केली आहे. पुजाचे हे दुसरे लग्न होते. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
 
विषारी द्रव प्राशन केल्यानंतर तिला वैद्यकीय उपचारासाठी भुसावळ शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी तिला जळगाव येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचे निधन झाले.