शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:10 IST)

भयंकर, पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या

suicide
अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यातून धक्कादायक बातमी आहे. खरवंडी येथे एका पडक्या घरात एका अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत दिलीप दादा शिंदे यांनी घटनेची खबर सोनई पोलीस ठाण्यास दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोनाई येथील खरवंडी रस्त्यापासून जवळच असलेल्या छत्रपती चौक परिसरात जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या
एका पडक्या घरात नम्रता शिवा शिंदे (वय-15) या अल्पवयीन मुलीने घराच्या छताला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.रविवारी सायंकाळी सहा वाजता ही घटना समोर आली असून याबाबत दिलीप दादा शिंदे यांनी घटनेची माहिती सोनई पोलीस ठाण्यास देण्यात आली. नम्रता हिने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समोर आले नाही. या संदर्भात सोनई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल एच. एम. गर्जे हे करत आहेत.