बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 मार्च 2019 (10:46 IST)

सुजय विखे आणि गिरीश महाजन यांची भेट, महाजन यांचे हे आहे स्पष्टीकरण

लोकसभा निवडणूक येत असून वातावरण तयार होत आहे. यामध्ये आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजप नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या घरी जाऊ भेट घेतली. त्यामुळे अर्थात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे/ही  भेट इतर कामच्या बाबतीत होती, राजकीय चर्चा झाली नसल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. 
 
सुजय विखे पाटील घरी आले, जवळपास एक तास चर्चा झाली. मात्र, कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. त्यांच्या मेडिकलच्या कॉलेज संदर्भात तर आले होते, विरोधी पक्षनेत्याच्या मुलाने दुसऱ्या पक्षात जाऊ नये असं काही नाही. असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. तर ते पुढे म्हणाले की, मुलायमसिंग यादव व अखिलेश यांची मतं भिन्न असून, मुलायमसिंग हे मोदींना शुभेच्छा देतात. त्यामुळे आता असं काही नाही ज्याला जे योग्य वाटेल त्याने ते करावं. असे वक्तव्य महाजन यांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.