सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 12 एप्रिल 2022 (09:50 IST)

या तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर

anath
राज्यातील शाळांना 2 मे ते 12 जून या कालावधीत उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. आगामी 2022-23 या शैक्षणिक वर्षातील शाळा 13 जूनपासून, तर विदर्भातील शाळा 27 जूनपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिली. परीक्षांचे निकाल सुटीच्या काळात घोषित करता येणार आहेत. 
 
शाळा उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असताना उन्हाळी सुटीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने सोमवारी परिपत्रक प्रसिद्ध केले.
 
राज्यातील पहिली ते नववी, अकरावीचा निकाल 30 एप्रिल रोजी किंवा त्यानंतरच्या सुटीच्या कालावधीत जाहीर करता येईल. मात्र तो निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.