रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (10:19 IST)

कोणताही आमदार मुलींना उचलण्याची भाषा करेल तर त्याची गाठ माझ्याशी - सुप्रिया सुळे

उत्तर महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करताना जळगांव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथे खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत युवती मेळावा संपन्न झाला. सर्वप्रथम सुप्रियाताईंनी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या व दौऱ्यातील सहभागाबद्दल आभार व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "युवतींच्या या मेळाव्यात मी जाहीरपणे सांगते. कोणताही आमदार मुलींना उचलण्याची भाषा करेल तर त्याची गाठ माझ्याशी आहे. दुःख याच गोष्टीचं वाटतं की यावर मा मुख्यमंत्री काहीच बोलत नाही.
 
गेले चार दिवस अतिशय प्रेमाच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. मी दरवर्षी असे दौरे घेते व यादरम्यान आपल्या ज्या समस्या असतील जे प्रश्न असतील त्या यातून समजण्याचे काम होते. या परिसरामध्ये सगळ्यात मोठे आव्हान आहे ते म्हणजे दुष्काळाचे सावट. मुख्यमंत्र्यांना मी नम्र विनंती करते लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा. आपला महाराष्ट्र अडचणीतून चाला आहे. आपल्या इथे दुष्काळ आहे मान्य आहे पण त्यावर मात करण्यासाठी आपण झाडे लावण्याची गरज आहे. आपल्या आयुष्यात आपणच बदल घडवू शकतो.
 
आपल्या विभागात दोन नंबरचे धंदे मोठ्या प्रमाणात आहे. यावर कारवाई होण्याची गरज आहे परंतु स्थानिक मंत्री अशा लोकांना पाठीशी घालत आहे हे दिसून होते याची चौकशी करणे गरजेचे आहे.
 
आपल्याला डॉ. बाबासाहेबांनी मतदानाचा हक्क दिला आहे. तरी आपण चुकीच्या मार्गाने जाऊन मतदान करू नये ही विनंती. आपल्या विभागातील स्थानिक प्रश्नांची यादी काढून त्यावर अमलबजावणी करण्याची सोय पक्षाच्या वतीने आपण करुयात.