शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (21:11 IST)

सुप्रिया सुळे यांनी चक्क शिंदे गटातील आमदारांचे केले कौतुक

supriya sule
खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क शिंदे गटातील आमदारांचे कौतुक केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमानकारक वक्तव्य केले त्या विरोधात आमदार संजय गायकवाड यांनी जी भूमिका घेतली ती कौतुकास्पद आहे. प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणूस शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करू शकत नाही असे ट्विट करत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कौतुक केले आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात मात्र मोठ्या प्राणावर चर्चा सुरु आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor