शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (16:12 IST)

राज ठाकरे यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया

raj thackeray
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल होणार आहेत. त्यांच्या पायाचे दुखणे वाढल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.
 
राज ठाकरे यांच्यावर उद्या हिप बोनची शस्त्रक्रिया होणार आहे. पण काही चाचण्यांसाठी राज ठाकरे आज लिलावती रूग्णालयात दाखल होतील.या चाचण्या पार पडणार असून उद्या शस्त्रक्रिया पार पडणार आहे. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.