शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जुलै 2018 (15:17 IST)

बी.पी जगताप यांना निलंबित करण्याचे अध्यक्षांचे निर्देश

अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीचे उपायुक्त बी.पी. जगताप यांनी जाणीवपूर्वक वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यास टाळाटाळ केली असल्याचा आरोप विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी मांडून केला. बारलावर या इसमाचे सख्खे भाऊ, चुलत भाऊ, काका, आतेभाऊ, मामेभाऊ व इतर नातेवाईक यांना वैधता प्रमाणपत्र दिले. याच आधारावर बरलावार यांनी जात वैधता प्रमाणपत्राची मागणी केली. मात्र जगताप यांनी जाणीवपूर्वक विलंब केला गेला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
 
विविध शासकीय पदावर काम करत असताना जगताप यांनी सुप्रीम कोर्टाने रद्द केलेल्या उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र दिले. आंध्र, कर्नाटक, राज्यातील अनेक लोकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र दिले. यातून त्यांनी ५०० कोटीपेक्षा जास्त संपत्ती जमवली असल्याची माहिती अजित पवार यांनी सभागृहाला दिली. या भ्रष्ट अधिकाऱ्याची चौकशी करण्याची व त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी अजित पवार यांनी केली. यावर अध्यक्षांनी बी.पी.जगताप यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले.