Widgets Magazine

श्रेयस तळपदेच्या पत्नीला स्वाईन फ्लू

swine flue
Last Modified गुरूवार, 20 जुलै 2017 (11:51 IST)
अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दिप्ती हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक तपासातून तिला स्वाईन फ्लू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वाईन फ्लू झाल्याची लक्षणं दिसताच मंगळवारी रात्री तपासासाठी दिप्तीला अंधेरीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासातून तिला स्वाईन फ्लू झाल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर उपचारासाठी तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोश्टर बॉईज ह्या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये श्रेयस तळपदे सध्या गुंतला आहे. या चित्रपटाद्वारे तो हिंदीमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे. याशिवाय गोलमाल चित्रपटाच्या पुढच्या भागातही त्याची भूमिका आहे. या दोन्ही जबाबदाऱ्या असल्याने त्याला त्याच्या बायकोकडे बघायला फारसा वेळ मिळत नाही. मात्र त्याला जेव्हा केव्हा वेळ मिळतोय तेव्हा तो बायकोची विचारपूस करायला रूग्णालय गाठतोय.


यावर अधिक वाचा :