शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2017 (11:06 IST)

पुणतांब्याचे शेतकरी राज ठाकरे यांच्या भेटीला

शेतकरी संपाच्या आंदोलनाला सुरुवात झालेल्या  पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. या भेटीवेळी मनसे नेते बाळा नांदगांवकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर तसेच पुणतांब्यातील शेतकरी बांधव मुरलीधर थोरात, बबनराव धनवटे, शांतीलाल भाटी, राजेश लुटे, गणेश जाधव यांची उपस्थित होती. राज ठाकरे पुणतांब्यात जाऊन शेतकऱ्यांची चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखालीच लढा लढवला जाईल, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. दरम्यान बाळा नांदगांवकर यांनीही काही दिवसांपूर्वीच पुणतांब्यात जाऊन संपकरी शेतकऱ्यांची भेट घेतली होती. तर राज ठाकरेंनीही शेतकरी संपावर आपली भूमिका मांडली होती.