शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 28 डिसेंबर 2022 (08:36 IST)

ठाण्याचा समीर गायकवाड ठरला ‘महाराष्ट्र श्री’

रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृह येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या समीर गायकवाड  ‘महाराष्ट्र श्री’  किताबाचा मानकरी ठरल़ा. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याहस्ते महाराष्ट्र श्री गायकवाड याला रोख रुपये 51000 आणि मनाची ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. तर स्पर्धेत ‘महाराष्ट्र किशोर’ हा किताब ईश्वर प्रदीप ढोलम याने पटकावल़ा
 
स्वामी माऊली बहुद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटना तसेच रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्यावतीने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिनानिमित्त 72 व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाटय़गृह येथे करण्यात आले होते. 25 व 26 डिसेंबर अशी दोन दिवस ही स्पर्धा घेण्यात आली. एकूण 6 गटात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील 350 स्पर्धक सहभागी झाले होते.

प्रत्येक गटातील स्पर्धा अत्यंत रोमहर्षक झाली. स्पर्धेत ‘महाराष्ट्र उदय’ हा किताब अजिंक्य पवार याने पटकावला. ‘महाराष्ट्र श्रीमान’ हा किताब स्वप्नील सुरेश वाघमारे याने पटकावला. ‘महाराष्ट्र फिटनेस’ हा किताब विश्वनाथ पुजारी तर ‘महाराष्ट्र कुमार’ हा किताब जगन्नाथ जाधव याने पटकावला. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते रोख रक्कम 21 हजार आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.फोटो : समीर गायकवाड व इतर विजेते 
 
 
Edited By -Ratnadeep Ranshoor