बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 डिसेंबर 2018 (09:22 IST)

ठाणेकर तुमचे पाणी महागले, सांभाळून वापर करा

पावसाने फार कमी वेळ दिल्याने मुंबई शहर आणि उपनगरवासियांना पाणीकपातीस सामोरे जावे लागणार आहेत्क. सोबतच  ठाण्याला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात येणार आहे. परिणामी, ठाणेकरांचे पाणी चांगलेच  महागणार असून, महत्त्वाचे म्हणजे मुंबईला ठाण्यातील धरणांमधूनच पाणीपुरवठा होतो आहे.  ठाण्याच्या भरवशावरच तहान भागवायची आणि ठाणेकरांवरच दरवाढ लादायची, असा हा प्रकार असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिकेने घेतलेल्या या दरवाढ करत , या  निर्णयामुळे वर्षागणिक १४.५८ कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. जवळपास  १५ वर्षांनंतर ही दरवाढ करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसाठी दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणी लागते. मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, विहार आणि तुलसी या सात धरणांतून हा पाणीपुरवठा केला जातो. यामधील १५० दशलक्ष लीटर पाणी हे ठाणे आणि भिवंडीला दिले जाते.