1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (17:47 IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मधील 'ते' संवाद व्हायरल!

shinde panwar fadnavis
सध्या मराठा आरक्षण हा ज्वलंत मुद्दा म्हणून समोर आले आहे. मनोज जरांगे पाटील हे 29 ऑगस्टपासून आमरण उपोषणासाठी बसले आहे. मनोज जरांगे पाटील यांना विविध पक्षाने उपोषण थांबवण्यासाठी विनंती केली आहे. तरीही मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर ठाम आहे. या बाबत सरकार गांभीर्याने लक्ष देत आहे. असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी एक व्हिडिओ समोर आला आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (13 सप्टेंबर) मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भेटले.त्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली. तत्पश्चात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मधील झालेला संवाद व्हायरल होत आहे.

 या संवादामुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे. या व्हिडीओ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याला काय ? बोलायचं अन् निघून जायचं,बोलून मोकळं व्हायचं. असे म्हटलं आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी हो येस असं म्हटलं आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माईक चालू आहे असं म्हणत आहे. या संवादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ट्रोल केलं जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit