मंगळवार, 5 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (15:45 IST)

घोर कलियुग, मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

boy killed
औरंगाबाद जिल्ह्यातील बाळपूर या गावात माथेफिरु मुलाने आईच्या डोक्यात कुऱ्हाड घालून हत्या केलेली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरु आहे. रमेश घुगे असं माथेफिरु मुलाचे नाव आहे. आरोपी रमेश हा मनोरुग्ण असून त्याच्यावर औरंगाबादच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
 
या घटनेत  शशिकलाबाई घुगे असं मृत आईचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी जालना जिल्ह्यातही एका दारुड्या मुलाने आपल्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना घडलेली होती. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपीने स्वत: घटनेची माहिती फोन करुन मामाला दिली होती आणि त्यानंतर घटनास्थळावरुन फरार झालेला होता.