केंद्र सरकारकडून कोकणातील नागरिकांना योग्य मदत पुरवणार

narayan rane
Last Modified गुरूवार, 22 जुलै 2021 (22:21 IST)
राज्यात मागील दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोकणात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थितीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच केंद्र सरकारकडून कोकणातील नागरिकांना योग्य मदत पुरवण्याचे आश्वासन नारायण राणे यांनी दिले आहे. बचावकार्यासाठी आवश्यक टीम पाठवणार असल्याचेही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. तसेच राज्य सरकारने तात्काळ नागरिकांसाठी योग्य मदत पुरवली पाहिजे असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत कोकणातील नागरिकांना केंद्र सरकारकडून मदत देणार असल्याची माहिती दिली आहे. नारायण राणे यांनी म्हटलय की, अतिशय गंभीर परिस्थिती या अतिवृष्टीमुळे निर्माण झाली आहे. राज्यात जवळपास ३५० मिली पाऊस पडलेला आहे. यावर उपाय आहे की, त्या ठिकाणी हेलकॉप्टरने लोकांना काढणे, बोटीने काढणे, योग्य जागी नागरिकांना पोहचवून त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था सरकारने करायला पाहिजे.
मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांच्याशी संवाद साधला आहे. त्वरित सगळी व्यवस्था हेलिकॉप्टर किंवा बोटी किंवा अन्य लागणारी मदत करतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नित्यानंद यांनी दिलं आहे अशी माहिती राणेंनी दिली. तसेच दुसरे मंत्री यादव यांच्याशी बोललो असून वेळ पडली तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बोलेल परंतु संबंधित मंत्र्यांशी बोलणं झाले असून मदत करण्याचे आश्वासन या मंत्र्यांकडून करण्यात आले आहे. अशी माहिती नारायण राणे यांनी दिली आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदूर्गाच्या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांशी नारायण राणे यांनी संवाद साधला आहे. या दोन्ही कलेक्टरसोबत संपर्क केल्यानंतरच केंद्रीय मंत्री नित्यानंद यांच्याशी संवाद साधून मदतीची मागणी केली आहे. यावर त्यांनी संपुर्ण मदतीची शाश्वती दिली असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

महाराष्ट्रात पूर आणि भूस्खलनात 207 ठार, अनेक बेपत्ता

महाराष्ट्रात पूर आणि भूस्खलनात 207 ठार, अनेक बेपत्ता
मंगळवारी पूरग्रस्त महाराष्ट्रात मृतांचा आकडा 207 झाला आणि कोयना धरणातून पाणी सोडल्याने ...

हरियाणा ते बिहारकडे जाणाऱ्या बसचा अयोध्यामध्ये झालेल्या ...

हरियाणा ते बिहारकडे जाणाऱ्या बसचा अयोध्यामध्ये झालेल्या अपघातात 18 ठार
उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला.

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार,ऊर्जामंत्री ...

वीज नसलेली पूरग्रस्त गावं सौर दिव्यांनी उजळणार,ऊर्जामंत्री यांची घोषणा
पुरामुळे ज्या गावात सध्या वीज पुरवठा सुरळीत करणे शक्य नाही, त्या गावातील घरांना मोफत सौर ...

राज्यात एकूण ८२,०८२ करोना ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात एकूण ८२,०८२ करोना ॲक्टिव्ह रुग्ण
राज्यात करोना रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९६.५४ ...

नाशिक शहरात या तीन ठिकाणी महापालिका उभारणार अद्ययावत ...

नाशिक शहरात या तीन ठिकाणी महापालिका उभारणार अद्ययावत रुग्णालये
नाशिक शहराच्या विकासासाठी पंचवटी, सिडको, सातपूर आणि गंगापूर या ठिकाणी नवीन अद्ययावत ...