शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 नोव्हेंबर 2022 (07:29 IST)

अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं

narayan rane
केंद्रीय मंत्री नारायण राणे माध्यमांशी संवाद साधला आणि दुष्काळ तसेच उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा आणि राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प, अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
 
शेतकर्‍यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत करावी अशी मागणी विरोधक करीत आहेत. ओला दुष्काळ जाहीर न करता देखील आज आम्ही मदत करीत आहोत. ओला दुष्काळ जाहीर करण्यास केंद्र आणि राज्य सरकारचे काही नियम असतात. हेच ‘उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वी ५० हजार रुपये इतकी मदत शेतकर्‍यांना मिळाली पाहिजेअशी मागणी करीत होते. ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकर्‍यांना एकदा तरी मदत केली का ? ते एकदा तरी शेतकर्‍याच्या बांधावर गेले का ? औरंगाबाद येथे उद्धव ठाकरे गेले आणि तिथे ते किती तास होते तर केवळ २६ मिनिटे होते.अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं’ असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor