गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जानेवारी 2022 (22:17 IST)

तर कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, टोपे यांची माहिती

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत. तसेच कोरोना रुग्णांचा आकडा वाढला तर कठोर निर्बंध लागू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असा इशारासुद्धा राजेश टोपे यांनी दिला आहे. तसेच राज्यात तिसऱ्या डोसचे लसीकरण सुरु करण्यासाठी राज्य सरकारने तयारी केली असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी राज्यातील निर्बंधांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात यायला हवी. संसर्ग थांबायला हवा या दृष्टिकोनातून गर्दीवर नियंत्रण आणण्याचा शासनाचे मत आहे. निर्बंधांबाबत मुख्यमंत्र्यांच्या बैठका होत असतात. आरोग्य विभाग, चीफ सेक्रेटरी, टास्क फोर्ससोबत चर्चा करत असतात. त्यामुळे जी काही मत आहेत ती जाणून घेऊन निर्बंधांबाबत निर्णय़ घेत असतात. त्यांच्या निर्णयानंतर आदेश जारी करण्यात येतात. मुख्यमंत्री लवकरच सगळा आढावा घेऊन निर्बंधाबाबत निर्णय घेतील. तसेच जर गरज पडली तर कठोर निर्बंधाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असे  टोपे म्हणाले आहेत.