शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (21:38 IST)

मुख्यमंत्री उद्या सीरमच्या आग लागलेल्या घटनास्थळाची पाहणी करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अर्थात शुक्रवारी  पुण्याला जाऊन सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आग लागलेल्या युनिटच्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. उद्या दुपारी मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालया कडून देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील इमारतीला आग लागली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
 
सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी दिली. "सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोनच्या सुमारास आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. आता आग विझवण्यात आली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृतदेह नोबेल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहेत,' असं टोपेंनी सांगितलं.