शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक : , बुधवार, 19 जुलै 2023 (21:50 IST)

सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला

nashik municipal corp
The Citilink workers strike has finally ended महापालिकेच्या सुरू असलेल्या सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा संप हा लागोपाठ दुसर्‍या दिवशी देखील सुरूच होता. कर्मचारी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत काम सुरू करण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत होते.
 
दरम्यान, कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांपासून रखडलेले वेतन देण्याचे निर्देश संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याने सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटला असल्याची माहिती सिटी लिंकचे व्यवस्थापक मिलिंद बंड यांनी दिली.
 
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी चालविण्यात येणार्‍या सिटीलिंक या बस सेवेतील चालक आणि वाहक हे दोन्हीही कर्मचारी ठेकेदाराच्या माध्यमातून हे कर्मचारी काम करीत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी या सिटीलिंकची स्थापना करण्यात आली होती. त्या वेळेपासून ठेकेदारी पद्धतीनेच कर्मचारी हे काम करीत आहेत. परंतु मागील दोन महिन्यांचे वेतन न मिळाल्यामुळे सुमारे पाचशे कर्मचारी हे कालपासून पगार मिळावा, या मागणीसाठी संपावर होते.
 
त्यामुळे मागील दोन दिवसांपासून शहरातील नागरिकांना अतिशय हाल सहन करावे लागले होते. मात्र महापालिकेच्या प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत, सिटीलिंककचे व्यवस्थापक मिलिंद बंड आणि ठेकेदार, तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी यांच्या बैठक होऊन संपावर तोडगा काढण्यात आला.
 
दरम्यान, सलग दुसर्‍या दिवशी देखील हा संप सुरू असल्यामुळे शाळेत व महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले होते. संप मिटल्याने बस सेवा सुरळीत सुरू होणार आहे.