मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (08:22 IST)

ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ

'आम्ही राज्यातल्या सत्तांतराकडे लक्ष ठेवून काम करत नाही. राज्यातलं सरकार एके दिवशी स्वत:च्याच ओझ्यामुळे कोलमडून पडेल.कारण अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ज्या दिवशी हे सरकार कोसळेल, त्या दिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ,' असं बिहारमधील राजकीय परिस्थितीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. 
 
प्रत्येक निवडणूक वेगळी असते आणि प्रत्येक निवडणूक तुम्हाला काहीतरी शिकवून जात असते. बिहारमधील मतदार अतिशय प्रगल्भ आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवला. कोरोना संकट काळात काही सरकारं केवळ टीका करत होती. त्यावेळी मोदींनी विविध योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मदतीचा हात दिला, असं फडणवीस यांनी सांगितलं.