शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 मे 2018 (14:43 IST)

झाडाची फांदी डोक्यावर पडून महिलेचा मृत्यू

मुबई येथे डोक्यावर झाडाची फांदी अंगावर पडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. पावसाळा जवळजवळ सुरु होणार म्हणून मुंबई महापालिकेकडून लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी नालेसफाई, रस्तेदुरूस्ती, वाढलेल्या व धोकादायक झाडाची तोडणी अशी सगळी काम केली जात असल्याचं  सांगितलं जात, असतानाही झाडं पडून लोकांच्या जीवावर बेतल्याच्या घटना मुंबईत पाहायला मिळत आहेत. घटना वाळकेश्वरमध्ये घडली आहे. बाणगंगा तलावाच्या परिसरात झाडाची फांदी अंगावर पडून ९१ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुखी लीलाजी असं मृत महिलेचं नाव आहे. या आगोदर सुद्धा अनेकांना आपला जीव द्यावा लागला आहे. सुखी लीलाजी फेरफटका मारण्यासाठी बाणगंगा तलावाजवळ  गेल्या होत्या. त्यावेळी एका झाडाची फांदी त्यांच्यावर कोसळली आहे.  यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारांसाठी गोकुळदास तेजपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. वृद्ध महिलेच्या डोक्याला दुखापत झाली तसंच त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर सुद्धा झाले होते.  प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र  डोक्यामध्ये झालेल्या दुखापती व रक्तस्त्रावामुळे महिलेचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला आहे. निष्काळजी पालिका कर्मचारी यंत्रणेमुळे महिलेला आपला जीव असा गमवावा लागला आहे.