testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

palkhi sohala
Last Modified शुक्रवार, 16 जून 2017 (12:43 IST)

देहूतून शुक्रवारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. पालखीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

विठूरायाच्या भेटीसाठी वारकरी अतूर झाले आहेत आणि आता पांडुरंगाच्या भेटीला जाण्यासाठी भक्त सज्ज झाले आहेत. आज देहूतून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
दरवर्षी तुकोबांच्या पालखीत शेकडो वारकरी सहभागी होतात. उन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत वारकरी पंढरीच्या दिशेने रवाना होतात.पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून खास व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याशिवाय डॉक्टर आणि अँब्युलन्सचं पथकही सोबत असणार आहे. त्यामुळे आज विठूनामाचा गजरात देहूनगरी दुमदुमून जाईल. तर शनिवारी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे.यावर अधिक वाचा :