1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 मे 2022 (21:03 IST)

ऊर्जामंत्री विश्रामगृहात आले आणि वीज पुरवठा खंडित झाला; जळगावमधील प्रकार

nitin raut
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत जळगाव दौऱ्यावर आले असताना एक प्रकार घडला आहे. त्याची सध्या राज्यभरात चर्चा होत आहे. राऊत हे गुरुवारी रात्री उशीरा भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या विश्रामगृहावर आले. ते येऊन काही वेळ होत नाही तोच विश्रामगृहातील वीज पुरवठा खंडित झाला. ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीतच वीज पुरवठा खंडित झाल्याने अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ झाली. अखेर काही वेळाने हा पुरवठा सुरळीत झाला.
 
विशेष म्हणजे, या सर्व प्रकाराचा ऊर्जामंत्र्यांनाच खुलासा करावा लागला आहे. राऊत म्हणाले की, सध्या लोडशेडिंगबाबत ज्या चर्चा आहेत त्या निवळ वावड्या उठविण्यात येत आहेत. काही ठिकाणी काही वेळेसाठी वीज पुरवठा खंडित झाला तर त्याला काही कारणे असतात. जास्त लोड आल्याने आणि डिपीवर उष्णता वाढल्यामुळे वीज बंद पडते, याचा अर्थ त्याला लोडशेडिंग सुरू आहे असं म्हणता येणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.