बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (15:10 IST)

Vashim News : बापानेच केला मुलाचा खून

murder
The father killed the son : कारंजा तालुक्यातील मसला गावात दारू पिऊन सतत भांडण आणि पत्नीसह आई-वडिलांना मारहाण करून सतत त्रास देणाऱ्या 45 वर्षीय मुलाचा बापानेच पहारीने वार करून खून केले आहे. ही घटना मंगळवारी (31 ऑक्टोबर) रात्री घडली आहे. शरद आकाराम सोनोने असं खून झालेल्या 45 वर्षीय मुलाचं नाव आहे. काहीच दिवसांपूर्वी याच कारणाने भांडण झाल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. तर मृताची एक17 वर्षांची मुलगीही आहे.
 
्यासनाधीनतेमुळे शरद सोनोनेचा त्याच्या वडिलांच्या हातून खून झाल्यानं अख्खं सोनोनं कुटुंब उद्धवस्त झाले आहे. मुलाचा खून करणार्‍या आरोपी बापाला धनज पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.