मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (10:33 IST)

सरकार मराठा आरक्षण आंदोलनच्या दरम्याने दाखल गुन्हे मागे घेणार

The government will withdraw the crimes registered during the Maratha Reservation Movement
मराठा समाजासाठी चांगली बातमी ठाकरे सरकार देणार आहे. यानुसार आता आरे, नाणार प्रकरणातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतल्यानंतर आता मराठा आरक्षण आंदोलन करणाऱ्यांवरचे गुन्हे तात्काळ मागे घ्या, अशी मागणी वाढत आहे. त्यानुसार सह्याद्रीवर कॅबिनेटची बैठक घेण्यात आली, चार तास चाललेल्या या बैठकीत अनेक महत्त्वाच्या निर्णय घेतले जाणार यावर  चर्चा झाली आहे.
 
मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली आहे. मराठा आंदोलकांच्या नेत्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असून, त्याबद्दल  एकनाथ शिंदेंनी यांनी प्रसार माध्यमांना  सांगितले आहे.
 
या आंदोलनात निरपराध लोकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही. जे काही राज्याच्या हितासाठी करावं लागेल, ते करण्याचा निर्णय आणि चर्चा कॅबिनेटमध्ये झालेली आहे. कुठला माणूस आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे कधीही पाहिलं जाणार नसून, हे राज्यातील नवीन सरकार आहे, नवीन मुख्यमंत्री आहेत. राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता प्राथमिकता कुठल्या प्रकल्पाला दिली पाहिजे, हे ठरवणं राज्य सरकारचं काम आहे. राज्याच्या हिताचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. तर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान आहे. कर्जाचा विषय आहे. याबाबतीत सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे असे शिंदे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांत आरे आणि नाणार आंदोलनातील गुन्हे मागे घेतलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मराठा समाजातील आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेण्याचं ठरवण्यात आलं आहे.