शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:35 IST)

जिद्द आणि मेहनतीच्या बळावर सोलापुरातील आजोबांनी 92व्या वर्षी मिळवली पीएच. डी.

PH.D.
सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील लालासाहेब बाबर यांनी जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर  वयाच्या 92व्या वर्षी पीएचडी (PhD) मिळवून आपली ध्येयपूर्ती केली आहे. वयाच्या 92व्या वर्षी पीएचडी मिळवणारे लालासाहेब बाबर हे ग्रामीण भागातील एकमेव ठरले आहेत.  
 
त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातला आहे. ब्रिटीशांनी केलेला अन्याय आणि अत्याचार त्यांनी जवळून पाहिला आहे. 1952 साली  लालासाहेब बाबर यांना शिक्षकाची नोकरी मिळाली. याच दरम्यान त्यांनी  विद्यार्थ्यांमध्ये समाजात होणारा अन्याय, अत्याचार, अनिष्ठ प्रथा आणि परंपरा या विरोधात लढण्याचे बळ ही दिले. आजही लालासाहेब 92 वर्षांचे असताना ही त्यांचा उत्साह व त्यांची स्मरणशक्ती  ही विलक्षण कौतुकास्पद आहे. शिवाय आजही ते सायकवरून प्रवास करतात. त्यांची ही जिद्द, मेहनत तरुणांना लाजवेल अशीच आहे.