बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जानेवारी 2022 (09:32 IST)

राज्यात पुढील 2 दिवसात गारठा वाढणार

गेल्या काही दिवसांपासून देशात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पाहायला मिळते. खरंतर, आणखी काही दिवस हवामानात असेल बदल होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. भारताचा बहुतांश भाग सध्या थंडीने गारठला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा सतत घसरत आहे. अशावेळी भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवस थंडीचा जोर कायम असेल, अशी शक्यता वर्तविली आहे.
 
पुढील 2 दिवसांत गारठा वाढणार
भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, पुढील 2 दिवसांत विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि गुजरात राज्यात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत आताच पारा घसरून हूडहुडी भरू लागली आहे. मंद वाऱ्यांमुळे थंडी असह्य झाली आहे. अशावेळी हवामान विभागाने दिलेला ताजा अलर्ट महाराष्ट्राच्याही काळजीत भर टाकणारा ठरला आहे.