अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली
येत्या ११ ऑक्टोबरला होणारी एमपीएसची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अभ्यासाला वेळ मिळावा म्हणून MPSC परीक्षा पुढे ढकलली, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनचं संकट होतं. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.