मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 जुलै 2021 (15:39 IST)

पुढील 100 दिवस महत्त्वाचे आहेत :अजित पवार

राज्यातील सर्वांनीच कोरोना नियमांचं पालन केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली, तीही नियमांचं पालन करुनच केली आहे.कमीत कमी लोकांमध्ये कार्यक्रम पार पाडले पाहिजेत.लग्न किंवा इतर कार्यक्रमालाही किती लोकं असली पाहिजे,हे नियम ठरवले आहेत. या नियमाबाहेर असेल, तर ते मंत्री असू द्या किंवा सर्वसामान्य, सर्वांना नियम सारखेच,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.तसेच, पुढील 100 दिवस महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.
 
ज्या नागरिकांनी लशींचे दोन्ही डोस घेतलेत, त्यांनी टप्प्याटप्प्याने बाहेर पडायला सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण, अनेकांचं मत वेगवेगळं आहे, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरही वेगळं मत मांडत आहेत. काही मान्यवर असं मत माडतात की, इथून पुढे 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत.त्या,120 दिवसांत आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.लोकांनी नियमांचं तंतोतंत पालन करायला हवं. मात्र, ग्रामीण भागात हे नियम पाळले जात नाहीत, मी नगर जिल्ह्यातील एका गावात गेलो होतो, तेथे मला नेहमीप्रमाणे वातावरण दिसलं, कुणीही मास्क घातला नव्हता, हा निष्काळजीपणा आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं.