काय सांगता! 51 लाखाचा बोकड
सध्या बुलढाण्यात एका बोकडाची चर्चा जोरात सुरु आहे महाराष्ट्राच्या बुलढाण्या जिल्ह्यातील करवंड गावात टायगर नावाचा हा बोकड खुप प्रसिद्ध झाला आहे.या बोकडाला बघण्यासाठी दूरवरून लोक गर्दी करत आहे.याचे कारण असे की हा बोकड उंच पुरा गडी,मोठं कपाळ,मजबूत बांधा असून हा बोकड दररोज जिममध्ये देखील जातो.विशेष म्हणजे की या बोकडाच्या पाठीवर जन्मतः 'अल्लाह ''असे उमटलेले आहे.असं म्हणतात की ज्याच्या कडे असे जनावरे असतात ते खूप नशीबवान असतात.
लोकांना या बोकडाची माहिती मिळतातच त्याला खरेदी करण्यासाठी किंमत द्यायला तयार आहे.सध्या त्याला 36 ते 51 लाखाची मागणी आहे.आपल्या बोकडाची किंमत 1 कोटीच्या जवळपासची मिळावी असे त्या बोकडाच्या मालकाची अपेक्षा आहे. हा लखपती असणारा बोकड किती किमतीत विकला जाणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वानाच आहे.