शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 मे 2021 (21:05 IST)

दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल असा लावला जाणार

दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मूल्यमापनासाठी नववी आणि दहावीतील आतापर्यंत झालेल्या शालेय स्तरावरील परीक्षांच्या निकालाचा आधार घेतला जाणार आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची चर्चा झाली. परीक्षांबाबत अंतिम प्रस्ताव अंतिम मंजूरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.  मुख्यमंत्र्यांनी मंजूरी दिल्यास शिक्षणमंत्री 1-2 दिवसात त्याची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.
 
शालेय स्तरावर झालेल्या नववीच्या परीक्षा तसेच दहावीच्या अंतिम परीक्षा वगळता  झालेल्या परीक्षांचं मुल्यमापन करण्याचा प्रस्ताव  शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे.