रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (08:22 IST)

कोरोना मृतांचे दाखले मोफत घरपोहच

कोरोना आजाराने दुर्दैवाने मृत्‍यू पावलेल्‍या रूग्‍णांच्‍या नातेवाईकांना शासकीय व खाजगी कामासाठी मृत्‍यू दाखल्‍याची आवश्‍यकता भासत आहे. यासाठी मनपाच्‍या वतीने मोफत व घरपोहच मृत्‍यु दाखला देण्‍याचा उपक्रम हाती घेतला आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात सक्रिय झाली होती. या लाटेने अक्षरश कुटूंबे उध्वस्त केली. यामध्ये दरदिवशी बाधितांची विक्रमी आकडेवारी वाढत होती.
 
त्याचबरोबरीने चिंतेची बाब म्हणजे मृत्युदर देखील वाढत असत. यामुळे महापालिका प्रशासनांवर देखील ताण पडला होता. कारण जिल्ह्यातील मृत्युदर वाढल्याने जिल्हा माहिती सुविधा केंद्राबाहेर मृत्यूचा दाखल घेण्यासाठी भलीमोठी रांगा लागत असता.
 
यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. अखेर याबाबत शहराचे महापौर यांनी तोडगा काढला आहे. कोरोनाने मृत पावलेल्या कुटुंबीयांची दाखला मिळवण्यासाठी होणारी परवड थांबवण्यासाठी अखेर महापौरांनी पुढाकार घेतला.
 
कोरोनाशी लढाई करताना दुर्दैवाने मृत पावलेल्यांचे दाखले त्यांच्या नातेवाईकांना घरपोच केले जाणार आहेत. महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या संकल्पनेतून अहमदनगरमध्ये हा नवा उपक्रम सुरू झाला आहे.
 
दोन ते चार दिवसात पोष्‍टाने किंवा हस्‍ते घरपोहच दाखला मिळेल असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले. प्रातिनिधिक स्वरूपात महापौर वाकळे यांच्या हस्ते एका नातेवाईकाला मोफत दाखला देण्यात आला. आयुक्‍त शंकर गोरे, उपायुक्‍त यशवंत डांगे, आरोग्‍याधिकारी डॉ.अनिल बोरगे यावेळी उपस्थित होते.