गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (17:04 IST)

हाच निर्णय अपेक्षित होता, संजय राऊत यांची प्रतिक्रीया

हाच निर्णय अपेक्षित होता असं  शिवेसना खासदार संजय राऊत यांनी म्हटल आहे. “जर बाबरी मशीद पडली नसती तर राम मंदिराचं जे भूमिपूजन झालं आहे तो दिवस पहायला मिळाला नसता,” असंही त्यांनी सांगितलं. बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी लखनऊच्या विशेष न्यायालयाकडून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात यावर ते बोलत होते.  
 
“न्यायालयाच्या निर्णयाचं शिवसेना तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वागत करत आहेत. अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती या सर्वांची मुक्तता झाली आहे. न्यायालयाने हा कोणताही कट नव्हता असं स्पष्ट केलं आहे. हाच निर्णय अपेक्षित होता. आता आपल्याला तो भाग विसरला पाहिजे. अयोध्येत राम मंदिर उभं राहत आहे. जर बाबरी पडली नसती तर आज राम मंदिराचं भूमिपूजन झालं आहे तो दिवस पहायला मिळाला नसता. त्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणार नाही,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.