रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 डिसेंबर 2020 (09:21 IST)

राज्यात शरद पवार यांच्या नावे योजना सुरु होणार

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्या नावे योजना सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. ग्रामसमृद्धी योजनेला शरद पवारांचे नाव देण्यात येणार आहे. 'शरद पवार ग्रामसमृद्धी योजना' या नावाने राज्य सरकार नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. मंत्रीमंडळ बैठकीत या योजनेला मंजुरी दिली जाणार आहे.  
 
शरद पवार हे राज्यासह देशातील राजकारणातील महत्वाचे नाव आहे. कृषी, रोजगार अशा विविध क्षेत्रातील त्यांचा अभ्यास दांडगा आहे. येत्या १२ डिसेंबरला शरद पवारांचा वाढदिवस आहे. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाविकास आघाडी सरकारने योजनेला त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतलाय. 
 
केंद्र सरकारच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून ही नवी योजना राज्य योजना म्हणून राबविण्यात येणार आहे.