बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 सप्टेंबर 2022 (11:11 IST)

ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ वादातून तरुणांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केली

st buses
एसटी बसचालकाने ओव्हरटेक केल्याचा रागातून दोन दुचाकीस्वारांनी एसटी बस चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना पेण तालुक्यातील रामवाडी या ठिकाणी घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसचालकाला रुग्णालयात दाखल केले आहे. स्वप्नील भगत असे या बसचालकाचे नाव आहे. बसचालकाला मारहाण केल्याप्रकरणी दोन्ही तरुणांना पोलिसांनी चालकाने ताब्यात घेतले आहे. 

एसटी चालक स्वप्नील बघत पनवेल -अलिबाग मार्गावर बस घेऊन जाताना रामवाडी जवळ दुचाकीस्वारांना ओव्हरटेक करण्यावरून वाद निर्माण झाला. या दरम्यान एसटी वाहकाने तरुणांना सरंक्षण देण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही तरुणांनी चालकासह वाहकाला मारहाण केली . या घटनेची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला रुग्णालयात नेले आणि तरुणांना ताब्यात घेतले.