शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 3 ऑक्टोबर 2023 (18:05 IST)

राज्य सरकार कडून दिवाळीत 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय

eknath shinde
महाराष्ट्रात दिवाळी निमित्त शिधापत्रिकाधारकांना फक्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षपदी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभाग आणि सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या 14 जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधापत्रिकेतील शेतकरी अशा तब्बल 1 कोटी 66 लाख 71 हजार 480 शिधापत्रिकाधारकांना हा आनंदाचा शिधा देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा समावेश करण्यात आला.

या पूर्वी या शिध्यात रवा, चणाडाळ , साखर, आणि खाद्यतेलाच्या समावेश होता. आता या मध्ये पोहे आणि मैद्याचा समावेश करण्यात आला आहे. या मध्ये 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धाकिलो चणाडाळ, रवा, मैदा आणि पोहे दिले जातील. या साठी एकूण 530 कोटी 19 लाख रुपये खर्चाला मान्यता दिली आहे.  
 


Edited by - Priya Dixit