सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 एप्रिल 2022 (11:15 IST)

पुढील 4 दिवस सूर्य तापणार ; राज्यात ऑरेंज अलर्टचा इशारा

सूर्य विदर्भात मागील काही दिवसांपासून जास्त तापत आहे. नागपूर, अकोला, वर्धा, चंद्रपुरात तापमान 45  अंशापेक्षा जास्त आहे. राज्यात काही भागात अवकाळी पाऊस पडला. तर राज्यातील विदर्भ  आणि  मराठवाड्यात उकाडा जास्त जाणवत आहे. नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. विदर्भात 2 मे पर्यंत ऑरेंज अलर्ट सांगण्यात आले आहे. 

या काळात उष्माघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरज असल्यास बाहेर पडावे अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे. पुढील चार दिवस संपूर्ण उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. 
 
सध्या राज्यात तापमान 45 अंशाच्या पुढे गेला आहे. काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याचे सांगण्यात आले आहे. शनिवार पासून 2  मे पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे.  
 
राज्यात येत्या 4 दिवसांत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आलाय. चंद्रपुरात पारा तब्बल 46.4 अंशांवर पोहचलाय. त्यामुळे पुढचे चार दिवस राज्यासाठी धोक्याचे असणार आहेत.
 
राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरात झाली असून इथे पारा 46.4 अशा पर्यन्त पोहोचला आहे. जळगावात 45.9 अंश एल्सिअस अकोला 45.4 अंश ,यवतमाळ 45.2, वर्धा 45.1 नागपूर 45.2 तर अमरावतीत 45 अंश तापमानाची नोंद झाली .