मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (22:06 IST)

तिघांनी मिळून केली भिक्षुकाची निर्घृण हत्या

three together
धुळे शहरातील चाळीसगाव रोड परिसरातील उड्डाणपुलाजवळ एका शुल्लक कारणावरून तिघांनी भिक्षुकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. खून करणारे तीन जणांपैकी दोघे बापलेक आणि त्यांचा साथीदार असल्याचे समोर आले. मृत व्यक्ती रस्त्यावर दिवसभर भिक्षुकीकरून उदरनिर्वाह करत होता. काही दिवसांपुर्वी मृत भिक्षुकाने संजय पखाले याला रस्त्यावर जाताना हटकले होते, या गोष्टीचा राग त्यांचा मुलगा प्रतीकला आला. त्याला राग अनावर झाला , याचा बदला घेत प्रतिकने त्याच्या मित्राच्या मदतीने दगडाने ठेचून भिक्षुकाला मारले. यादरम्यान त्या भिक्षुकाचा मृत्यु झाला.
 
मोहाडी पोलिसांनी ह्या प्रकरणात चौकशी सुरू केली. ह्या खूनाचा तपास घेत त्यांना प्रतिकवर संशय आला आहे. प्रतिकला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी केल्यानंतर सर्व सत्य बाहेर आले. पोलिसांनी याप्रकरणात संजय पखाले आणि आकाश बोरसे याला अटक केले.