1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (21:18 IST)

उद्धवजींना सल्ला देण्याची वेळ निघून गेली राष्ट्रवादीवरही चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल

The time for giving advice to Uddhavji has passed. Chandrakant Patil's attack on NCP too Maharashtra Regional News उद्धवजींना सल्ला देण्याची वेळ निघून गेली राष्ट्रवादीवरही चंद्रकांत पाटलांचा हल्लाबोल
राष्ट्रवादी हा पक्ष हा स्वतःच्या स्वार्था पायी कोणालाही सोबत घ्यायला तयार आहे. इतिहास पहिला तर गरजेनुसार, भूमिका बदलण्याचा इतिहास आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याची वेळ निघून गेली. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते कोल्हापुरात बोलत होते.

राष्ट्रवादी पक्षाने महाविकास आघाडीने गृहखात्याचे मागणी शिवसेनेकडे केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यावर गृहखाते ऍक्शन घेत नाही. त्यावेळी मी बोललो होतो. उद्धवजी! हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मातोश्रीला देखील कॅमेरे लावतील. पण त्यावेळी माझी चेष्टा केली. मात्र आज ते खरे ठरत आहे. आज सेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. राष्ट्रवादी हा पक्ष हा स्वतःच्या स्वार्था पायी कोणालाही सोबत घ्यायला तयार आहे. इतिहास पहिला तर गरजेनुसार, भूमिका बदलण्याचा इतिहास आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मात्र राज्याच्या राजकारणाचे घडत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना मी काय सांगणार? सल्ला देण्याची वेळ निघून गेलेली आहे. आम्ही यापूर्वीच सांगितलं होतं गृहमंत्रीपद तुम्ही राष्ट्रवादीला देऊ नका. काँग्रेसला देऊ नका, ते तुमच्याकडे ठेवा. मात्र सध्या ही वेळ निघून गेली आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

खासदार संजय राऊत हे उद्धवजींचे कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला पूरकच म्हटले पाहिजे. मात्र कट्टर शिवसैनिक शांत बसला असता काय? असा सवाल करत राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅरोलवर काम करत आहेत. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.