शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (14:50 IST)

संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन होताच कामा नये - भाई जगताप

महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन लावण्याच्या उपायाला काँग्रेसनं कडाडून विरोध केलाय. लॉकडाऊनला काँग्रेसचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मांडलीय.
 
भाई जगताप म्हणाले, "लॉकडाऊनच्या बाबतीत वेगवेगळे सूर आणि प्रवाह ऐकायला मिळत आहेत. पण काँग्रेसचे स्पष्ट मत आहे की, लॉकडाऊन होताच कामा नये."
 
"मागच्या लॉकडाऊनमध्ये जनतेने आयुष्यभर जे जमवलं होतं, ते वापरुन कसाबसा आपला संसार चालवला होता. पण आता जर पुन्हा लॉकडाऊन झाले, तर मात्र त्याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होतील. म्हणून लॉकडाऊन होताच कामा नये," असंही भाई जगताप पुढे म्हणाले.