मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 21 जून 2022 (21:29 IST)

शिंदेसोबत गेलेल्या आमदाराच्या पत्नीची पोलिसांकडे तक्रार

nitin deshmukh
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतमध्ये गेलेले बाळापूर मतदारसंघातील शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

कालपासून माझे पती बेपत्ता आहेत. त्यांना लवकर शोधावे, असे प्रांजल देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणाला वेगळेच वळण लागण्याची शक्यता आहे.
अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापूरचे नॉट रिचेबल आमदार नितीन देशमुख हरवल्याची तक्रार पत्नी प्रांजली देशमुख यांनी दिली आहे. अकोला शहरातील सिव्हील लाईन पोलिसांत मिसिंगची तक्रार देण्यात आली, काल रात्रीपासून संपर्कात नसल्याची तक्रार देण्यात आली.
 
सोबतच्या लोकांनाही कुठे आहे हे माहित नसल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. आपल्या पतीला लवकर शोधा अशी मागणी करीत त्यांनी पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
नितीन देशमुख यांचा मुक्काम एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये होता. मात्र, आज सकाळी छातीमध्ये दुखू लागल्यामुळे देशमुख यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नितीन देशमुख यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याची माहिती आहे.