शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 मार्च 2022 (08:46 IST)

युवकाने पॅरासीटामॉलच्या तब्बल २० गोळ्या घेतल्या

वर्ध्यातील शिवाजी चौकाजवळील श्रीराम फायनस सिटी येथे सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या युवकाने स्वतः पॅरासीटामॉल गोळ्यांचा ओव्हरडोज घेतल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेची शहर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
 
मृतक रजत मेंढे (वय 27) हा 29 जानेवारीला श्रीराम फायनस सिटी येथे सुरक्षारक्षक कामावर हजर झाला. ड्यूटी उपस्थित असताना त्याच्याजवळ असलेल्या पॅरासीटामॉल (Paracetomol) गोळ्यांचा ओव्हरडोज घेऊन तिथेच झोपुन राहिला. आणि सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान त्याच्या वडील राजपाल मेंढे यांना फोन वरून माहिती दिली की माझी प्रकृती खराब आहे. या माहितीवरून त्याचे वडील देवळीवरून वर्ध्याला हजर झाले व त्याला पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात येथे भरती करण्यात आले. त्याला भरती केले असता त्याचा 9 मार्च ला उपचार दरम्यान मृत्यू झाला याबाबत सेवाग्राम रुग्णालयाच्या (Sevagram Hospital) माहितीवरून वर्धा शहर पोलीस ठाण्यात नोंद केली असून तपास सुरू आहे.अशी माहिती शहर पोलिसांनी दिली.
 
पॅरासीटामॉलच्या किती गोळ्याचे केल्या सेवन?
रात्रीला सुरक्षा रक्षकांचे काम करताना रजत मेंढे याने स्वतःच पॅरासीटामॉलच्या गोळ्या किती सेवन केले याबाबत अजूनही माहिती आली नसली तरी त्यांनी कधी 30 तर कधी 20 गोळ्या खाल्ल्या असल्याची माहिती डॉक्टरांना दिली आणि त्यानंतर तिथेच झोपून राहिला सकाळी त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर एक महिन्याच्या उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला पॅरासीटामॉलच्या ओव्हरडोज गोळ्या खाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अहवाल पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.